Sale

240.00

Kela Hota Attahas | केला होता अट्टहास

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.

कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे. सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

     

Share

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.

कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे.

ही कादंबरी केवळ घटनांची जंत्री नाही. कादंबरीच्या ओघातच या तरुणांच्या संभाषणांमधून, शिबिरातील चर्चामधून, पत्रांमधून, मनोगतांमधून साठ, सत्तर व ऐंशीच्या दशकांमधील आपल्या देशातील महत्त्वाच्या घडामोडींवर खल होत असतो, तसेच अन्य देशांमधील घडामोडींवरील विवेचन, मतमतांतरे सहजपणे येत राहतात. सोव्हिएत संघाबरोबरच पूर्व युरोपमध्येही समाजवाद कोसळल्यानंतर जगभर जी व्यवस्था उदयास येत गेली त्या अनुषंगाने युरोप, अमेरिका, आफ्रिका यांमधील महत्त्वाच्या चळवळी आणि खळबळीही या कादंबरीच्या कवेत येतात.

मुख्य पात्रांचं भावजीवन, त्यातला तारुण्यसुलभ रोमँटिसिझम, तोही तर आहेच कादंबरीत. संयमित आणि हळुवार. जमिनीशी असलेल्या नात्याबरोबरच इथे स्त्री-पुरुषांमधल्या बदलत्या नात्यांचा वेध घेतला गेला आहे.

सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

Size

M, S

Pages

272

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kela Hota Attahas | केला होता अट्टहास”

Your email address will not be published.