November 3

‘श्यामची आई’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व मुलाखत

Loading Events
  • This event has passed.

About The Event

Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune
पुणे, महाराष्ट्र 411030 India
November 3, 2023
6:00 pm - 8:00 pm

साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाच्या साधना प्रकाशनाकडून आलेल्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन १९३३ मध्ये साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकाने मागील नऊ दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीवर प्रभाव टाकलेला आहे, या पुस्तकाच्या काही लाख प्रती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत. अशा या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून येत आहे. या आवृत्तीत ‘श्यामची आई’ या नव्या सिनेमातील ३५ छायाचित्रे त्या त्या प्रसंगाच्या ठिकाणी समाविष्ट केली आहेत, मुखपृष्ठावरही सिनेमातील श्यामच्या कुटुंबाचे छायाचित्र आहे. उत्तम कागद व आकर्षक छपाई असलेली ही हार्डबाऊंड आवृत्ती भेट देण्यासाठी व संग्रही ठेवण्यासाठी विशेष उपयुक्त आहे.

Share: