हमीद दलवाई | Hamid dalwai
मुस्लीम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. 1970 मध्ये 'मुस्लीम सत्यशोधक मंडळ' स्थापले. मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लीम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे.
हमीद दलवाई यांनी इ.स. 1966 मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी, हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लीम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लीम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले.
त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.
हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लीम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे, सामाजिक क्रांतिकारक हमीद दलवाई यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.
Author's books
इस्लामचे भारतीय चित्र | Islamche Bhartiya Chitra
इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.
कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा | Kanosa : Bhartatil Muslim Manacha
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू-मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
भारतातील मुस्लिम राजकारण | Bhartatil Muslim Rajkaran
भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.
हमीद दलवाईंंची पुस्तके| Hamid Dalawainchi pustake
इस्लामचे भारतीय चित्र
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा
भारतातील मुस्लीम राजकारण
अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
जमिला जावद आणि इतर कथा