Author

यदुनाथ थत्ते | Yadunath Thatte

5 ऑक्टोबर 1922 ते 10 मे 1998 असे पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या यदुनाथ थत्ते यांची 1942 च्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, सेवादलाचे कार्यकर्ते-नेते, आंतरभारतीचे नेते-प्रणेते, साधना साप्ताहिकाचे संपादक आणि शंभरांहून अधिक लहान-मोठ्या पुस्तकांचे लेखक अशी पंचरंगी ओळख सांगता येईल. मात्र 1949 ते 82 अशी तब्बल 34 वर्षे त्यांनी साधना साप्ताहिकाच्या संपादनाचे जे काम केले ते विशेष उल्लेखनीय आहे, त्यातील अखेरची पंचवीस वर्षे ते मुख्य संपादक होते.

Author's books

Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा

240.00

मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.

     

मुस्लिम समाजातील वाहते वारे | Muslim Samajatil Vahate Vaare

120.00

‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.