राजकीय

Saleनवी पुस्तके

Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद

240.00

२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.

१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

 

   

Bakhar: Bharatiy Prashasanachi | बखर: भारतीय प्रशासनाची

280.00

भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख

Center Page | सेंटर पेज

200.00
सेंटर पेज (लेखसंग्रह) – राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ४० व्यक्तींच्या वर्तनातील व कार्यातील विसंगती व विरोधाभास टिपत केलेले मर्मभेदी लेखन.

     

Yugantar | युगांतर

140.00

युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.

 

            

Bharat Ani Bhartache Shejari | भारत आणि भारताचे शेजारी

240.00
भारत आणि भारताचे शेजारी (लेखसंग्रह) – पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, चीन, श्रीलंका, मालदीव या शेजारी राष्ट्रांच्या राज्यव्यवस्थांविषयी अभ्यासकांनी लिहिलेले लेख.

Mahatma Gandhinchi Vicharsrushti | महात्मा गांधींची विचारसृष्टी

140.00
महात्मा गांधींची विचारसृष्टी – काही अलक्षित पैलू (लेखसंग्रह) – गांधींविषयी खूप काही लिहले गेले आहे, पण त्यातूनही फार लक्ष गेले नाही असे काही पैलू दाखवणारे पुस्तक.

     

Mahatma Gandhi : Jivan Ani Karyakal | महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ

600.00
जगाच्या इतिहासात ज्या मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या पाठीशी सरकारची शक्ती उभी होती. चर्चिल, रुझवेल्ट, लॉईड जॉर्ज, स्टॅलिन, लेनिन, हिटलर, वुडरो विल्सन, कैसर, लिंकन, नेपोलियन, मेटरविच आणि टेलीरँड ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याशी तुलना करता, अधिकारावर नसलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव मनात येते, ते म्हणजे कार्ल मार्क्स. परंतु त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेची व्यवस्था कशी असावी याची निश्चित तत्त्वप्रणाली मांडली. गांधींच्याप्रमाणे माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीला अंत:करणपूर्वक ज्यांनी आवाहन केले, त्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपल्याला कित्येक शतके मागे जावे लागेल. धार्मिक इतिहासाचा तो एक कालखंड होता. येशु ख्रिस्त, रोमन चर्चमधील काही प्रीस्ट्स्, बुद्ध, हिब्रूंचे ईश्वराचे प्रेषित आणि ग्रीक संत इत्यादी धर्मवेत्यांनी माणसाच्या सदसद़्विवेकबुद्धीला हिरिरीने आवाहन केले होते. पण ते सगळे धर्मप्रचारक होते.
गांधी या सर्वांपासून निराळे होते. त्यांनी ईश्वर किंवा धर्माचा प्रचार केला नाही. ते जणू जागते वागते प्रवचनकार होते. त्यांनी असे दाखवून दिले की, आधुनिक काळात आणि या काळातील राजकारणातही त्या सर्वांची तत्त्वे लागू करता येतील. सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून माणसाला गिळंकृत करणाऱ्या आधुनिक जगात गांधींच्यासारखा एखादाच चांगला माणूस निर्माण होणे, हे अशक्य होते. सर्वच दृष्टींनी ते अत्यंत व्यवहारी होते. आयुष्य हे विविध प्रकारच्या जिवंतपणाने भरलेले असते याची त्यांना जाण होती.
अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी लिहलेले ‘Mahatma Gandhi – His Life and Times’ हे पुस्तक 1951 ला प्रसिद्ध झाले. प्रकाशनानंतर सत्तर वर्षांनी हे पुस्तक प्रथमच मराठीत आले आहे. ‘गांधी’ हा ऑस्करविजेता सिनेमा याच पुस्तकावर आधारलेला होता.

     

 

 

1 2 4