समता संगर (लेखसंग्रह) – १९९८ ते २०१३ या १५ वर्षांत, साधनाचे संपादक असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहलेल्या अनेक संपादकीय लेखांमधील निवडक ७० राजकीय – सामाजिक विषयांवरील लेख.
सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह) – २००६ ते २०१३ या आठ वर्षांत साधनाचा युवा संपादक व कार्यकारी संपादक म्हणून काम करताना लिहलेल्या संपादकीय लेखनातील निवडक ४५ लेख.
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, अंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा २० नामवंतांनी अत्यंत महत्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.
हिंदभक्त विदेशिनी (व्यक्तिचित्रे) – विदेशातून आलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या मेरी कार्पेन्टर, ॲनी बेझंट, मीरा बहन इत्यादी ११ महिलांची ओळख करून देणारा लेख.