सामाजिक

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

नवी पुस्तके

भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank

50.00

क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.

थैमान चंगळवादाचे | Thaiman Changalvadache

50.00

आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन् उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

     

1 10 11