हे मित्रवर्या | He Mitravarya
₹100.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या 67 स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या 67 स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.
हिंदीतील प्रसिद्ध लेखक कृष्ण चंदर यांच्या ‘दरवाज़े खोल दो’ या मूळ उर्दू नाटकाचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे.
एकाकीपणात गजबज भेटते. पण गजबज असूनही माणूस एकाकी असतो. एक टिचकी मारल्यावर कॅलिडोस्कोप हलतो. आतले रंग, आतल्या रेषा रचतात निराळाच अवकाश सर्वांत मोठी आकृती आहे ती मात्र पंचखंडी पृथ्वी अखंड अवकाश… – वसंत बापट
1990 दरम्यान त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय, नेपाळ या प्रदेशांत भ्रमंती केली, त्यावर आधारित लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांचेच ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले, स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात नऊ अतिरेकी ठार झाले आणि अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत हाती लागला. चार दिवस चाललेल्या त्या धुमश्चक्रीत पावणेदोनशे लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तो दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवरील हल्ला होता, जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली गेली, 26/11 या नावाने तो ओळखला जातो. हेमंत करकरे यांची ओळख भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) कर्तबगार अधिकारी म्हणून महाराष्ट्राला होती. साहजिकच, त्यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतील लहान-थोर हळहळले. त्यांच्या कुटुंबीयांवर तर तो खूपच मोठा आघात होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे (कविता यांचे) धैर्य आणि बाणेदार वर्तन देशभर विशेष आदराचा विषय बनले. त्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांची कन्या जुई हिने हेमंत करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातलग, सहकारी व समाजातील अन्य प्रतिष्ठित लोक यांच्याशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे.
पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.
सामाजिक तत्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरूर आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:
श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरुनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.
वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)