एक मैफल | Ek Maifal
₹60.00ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.
प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे । Prashna Tumcha Uttar Dabholkaranche
₹70.00हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.
सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat
₹70.001901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले.
त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’.
तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.