Manvantar | मन्वंतर
₹140.00मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
लोकशाहीचा कैवारी (चरित्र) – उत्कृष्ठ संसदपटू व समाजवादी नेते अशी ओळख असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे राजकीय, सामाजिक जीवन त्यांच्या मित्राने रेखाटले आहे.
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या १५ भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
चले जाव (भाषणसंग्रह) – ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद
टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू -मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान – थोरांशी साधलेली संवादचित्रे.