Tarunaisathi Dr. Narendra Dabholkar | तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर
₹200.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि नंतरच्या कालखंडातही अनेक युवक-युवती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या तरुणाईला डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा अधिक तपशीलवार परिचय व्हावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीला प्रेरणा मिळावी, हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे.
Vardan Ragache | वरदान रागाचे
₹200.00‘Legacy of Love’ हे पुस्तक मराठीत ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे ‘Gift of Anger’, त्याचा हा मराठी अनुवाद.
Bijapur Diary | बिजापूर डायरी
₹200.00छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹200.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
Aadhar Nasleli Mansa | आधार नसलेली माणसं
₹160.00वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.