सामाजिक

Saleनवी पुस्तके

Dev Tethechi Janava | देव तेथेचि जाणावा

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 25 व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद

240.00

21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.

1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

 

   

चिखलाचे पाय | Chikhalache Pay

100.00

डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.

– प्रा. डॉ. तारा भवाळकर

     

थैमान चंगळवादाचे | Thaiman Changalvadache

50.00

आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन् उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

     

लढे अंधश्रद्धेचे | Ladhe Andhashraddheche

280.00

लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.

 

            

Rashtriya Ekatmata aani Bharatiya Musalman | राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

240.00
हमीद दलवाई यांच्या मते- मुस्लीम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे, असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबरसाहेबांनी जो प्रयोग केला, त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे, हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लीम मन बनते, ते धर्मसुधारणेस व समाज-प्रबोधनास कसे तयार होणार?
भाई वैद्य (प्रस्तावनेतून)

     

बिकट वाट | Bikat Vaat

120.00
बिकट वाट (व्यक्तिचित्रे) – सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सहा महिलांनी प्रतिकूलतेशी संघर्ष करत केलेला समाजसन्मुख प्रवास.

     

युगांतर | Yugantar

140.00

युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.

 

            

1 3 4 5 11