Bijapur Diary | बिजापूर डायरी
₹200.00छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.
‘Legacy of Love’ हे पुस्तक मराठीत ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे ‘Gift of Anger’, त्याचा हा मराठी अनुवाद.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि नंतरच्या कालखंडातही अनेक युवक-युवती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या तरुणाईला डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा अधिक तपशीलवार परिचय व्हावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीला प्रेरणा मिळावी, हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे.
१८६६ ते १९१५ असे जेमतेम ४९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृतीवर्ष आले तेव्हा, म्हणजे १९२४ मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या २४ वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी १९२५ मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.