या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, सघन शेती बाजारपेठ असणारं व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्विशिक्षकी शाळा, तीनशे-साडेतीनशे पट असणारी शाळा – अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे. अमुक एका प्रकारच्या शाळेत यश मिळू शकतं, अमुक अडचणी आहेत म्हणून यश मिळू शकत नाही; असं म्हणता येणार नाही. याउलट, या प्रत्येक शाळेत काही ना काही अडचण आहे. त्या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांना छोटे-मोठे संघर्ष करावे लागले आहेत. कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या बळावर या शिक्षकांनी आपापल्या शाळा उभ्या केल्या आहेत.
एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य | Eka Kombdyache Abhivyakti Swatantrya
₹100.00ही कहाणी आहे गब्रू नावाच्या कोंबड्याची, त्याच्या आरवण्यासंबंधीची. गब्रूच्या आरवण्यामुळे झोपमोड होते अशी तक्रार केली जाते. त्या वेळेस कोंबड्याच्या बाजूने उभी राहतात सृजन कट्ट्यावरची मुलं. ही मुलं गोष्टी ऐकतात, सांगतात आणि लिहितातही!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मोल त्यांनी ओळखलंय. चिकित्सक, संवादी वृत्ती. आणि संवेदनशीलता यामुळे या मुलांना परीक्षा, अभ्यास, शिकणे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याची डोळस दृष्टी आहे. कोंबड्याच्या आरवण्याच्या नैसर्गिक अभिव्यक्ती हक्कावर गदा येण्याची वेळ येते तेव्हा, ही धडपडणारी मुलं पुढाकार घेतात. पुढे होतो नाट्यमय प्रवास… त्यातून कुमारवयातील ऊर्जेला योग्य वाट मिळते. आणि मग मुलंही मोठ्यांपुढे आदर्श निर्माण करतात, याचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो.
कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे उपदेश न करता कल्पना आणि विचार करायला लावणारी आहे. परिणामी, ही कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांविधानिक मूल्ये याविषयी जाणीव जागृती करते. कादंबरीत आलेल्या लोककथा, लोकगीते आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यामुळे एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. संघर्ष, नाट्य, चमत्कार, अद्भुत प्रसंग यामुळे कुतूहल वाढते. कहाणी उत्कंठावर्धक होते, कथानक झपाटून टाकते…!
Reviews
There are no reviews yet.