8 ऑगस्ट 1942 च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. त्यानंतर त्या ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. आणि मग महात्मा गांधी यांनी, ‘हा ठराव सभेने मंजूर करावा’ असे आवाहन करणारे प्रास्ताविक भाषण केले. ठरावाला उपस्थित प्रतिनिधींची मंजुरी मिळाल्यानंतर गांधीजींनी लढ्यामागची कारणमीमांसा आणि पुढची दिशा यांवर हिंदीतून मुख्य भाषण केले… आणि समारोपाचे भाषण इंग्रजीतून केले. ही तिन्ही भाषणे मिळून गांधीजी जवळपास सव्वादोन तास त्या सभेत बोलले. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली ती सभा रात्री 10 पर्यंत चालली होती.
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार | Gandhiji Ani Tyanche Tikakar
₹280.00गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले – ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
Reviews
There are no reviews yet.