गांधीजींच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या देशी- विदेशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते! सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मागरिट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मागरिट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने आलेल्या, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या. काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत् वाटावे असे विश्व मनासमोर साकारत गेले.
Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण
₹40.00अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.
Reviews
There are no reviews yet.