एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलत: निग्रोंची- पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹280.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
Reviews
There are no reviews yet.