अकरा हिंदभक्त विदेशिनींच्या हिंदभक्तीने प्रेरीत होऊन केलेल्या कार्याच्या या कथा आहेत. हिंद हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. एक-दोन अपवाद सोडता इतर सर्व हिंदुस्थानात आल्या, त्या वेळी हिंदुस्थान हा अखंड देश होता. या देशाला आपणही हिंदुस्थानच म्हणत असू. भारतीय कवींची कवने हिंददेशावरच असत..
मेरी कार्पेटरपासून या एकादश कथांना सुरुवात होते. सोफिया वाडिया यांच्या कथेने शेवट. तसे पाहिले तर या देशात काही पाश्चिमात्य महिला एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून येत होत्या. त्या सर्व युरोप अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या मिशनमधून आलेल्या नन्स होत्या. त्यापैकी काहींनी शिक्षण, आरोग्य, धर्मप्रचार अशी मिशनने त्यांना नेमून दिलेली कामे केली.
या एकादश महिलांचे महत्त्व हे त्यांच्या हिंददेशावरील निष्ठेमुळे आहे- नव्हे भारतभूमी ही त्यांची जीवननिष्ठाच होती. या देशाचे स्वातंत्र्य, महिला उन्नती, बालकांचे अधिकार व शिक्षण, विकास या सर्वांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न श्रेष्ठ आहेत. त्यांची ओळख भारतीय जनतेला करून देऊन त्यांना कृतज्ञतेचा प्रणाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.