कैफियत : माझी. माझ्या भोवतालची. प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची, माणसांची. साऱ्यांचीच. आमचं साऱ्यांचंच अस्तित्व धोक्यात आलंय. पटणार नाही तुम्हाला. पण खरंच. आम्ही जिवंत राहू, तग धरू अशी शक्यताच अंधुक झालीय. कोणीतरी निर्दयपणे ओरडबाडतंय साऱ्यांना. ओरबाडण्यात आम्ही सामील असणारच. कारण ओरबाडणं, हिसकावणं, लुटणं, लंपास करणं म्हणजे काय? हे कळावं, अशी संवेदनाच संपून गेलीय आमच्यातून. आम्ही जिवंत आहोत, म्हणजे काय? आम्ही काय करतोय? काय बोलतोय? कळतच नाही आम्हांला. भांबावून टाकणारं, भयग्रस्त करणारं, भोवळ आणणारं वर्तमान.
माझी काटेमुंढरीची शाळा । Mazi Katemundharichi Shala
₹160.00माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.