या विस्तृत जीवनाचा विचार करत असताना लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे इथं काही आपण तेवढेच नाही. आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीची माणसंही इथं आहेत, प्राणीमात्रही आहेत.. त्यांचा नफा-तोटा आणि आपला नफा-तोटा एकमेकांत गुंतले आहेत हे आपण जाणलं पाहिजे. आपल्या कितीतरी इच्छा पूर्ण होत नाहीत. इतरांच्या लाभामध्ये त्याचा अडसर झाल्यामुळे असं घडत आहे. इतरांचे लाभ आपल्यासारख्या एकट्या-दुकट्यांच्या अपेक्षा मोडून काढण्याइतके बलिष्ठ असतात. त्यामुळे आपले प्रयत्न व्यर्थ गेले म्हणून गळा काढायची गरज नाही. जगात जगत असताना शेकडो वेळा हार पत्करल्यानंतर एक-दोन दशाचे प्रसंग कदाचित येतील. जीवन-संग्रामात जगण्याबरोबरच हरण्यालाही तितकंच महत्त्व आहे.. हरण्यातूनच जीत शक्य होत असते. हे जाणून घेतलं तर आपल्या विस्तृत जीवनातील कल्पना आणि कृती कधीही निरर्थक भासणार नाहीत. त्या आपलं जीवन उजळून टाकतात. मी जगण्यासाठी कष्ट घेतले आहेत, माझ्याकडून शक्य होतं ते सगळं मी केलं आहे, अशी तृप्ती आपल्या जीवनातून आपल्याला मिळाली पाहिजे. या लेखनातून व्यक्त झालेले अभिप्राय हेच माझं जीवनाविषयीचं अंतिम चिंतन असा निष्कर्ष काढू नये. आजवरच्या माझ्या जीवनातील अनुभवांचं हे सार आहे. पुढील जीवन या अभिप्रायांवर संस्कार करू शकेल, एवढंच काय बदलही घडवू शकेल. जोपर्यंत जीवन हाच सत्याचा शाश्वत शोध घेण्याचा मार्ग आहे, तोपर्यंत हे अभिप्राय व्यर्थ नाहीत. ‘सत्य’ ही विशिष्ट काळाच्या तुलनेनुसार बदलणाऱ्या जीवनाविषयीची जाणीव आहे….
₹200.00 ₹160.00
कारंत चिंतन | Karant Chintan
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 110 |
Related products
श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas
‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
दंतकथा । Dantkatha
हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या 1990 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जिवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतीकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
माझी वाटचाल | Mazi Vatchal
जीवनाच्या वाटचालीतील मुख्यत: राजकीय कार्याचे निवेदन करणाऱ्या ‘माझी वाटचाल’ या आत्मकथेत ग. प्र. प्रधान यांनी थोर नेत्यांच्या व विचारवंतांच्या जीवनाचा आणि विचारांचा त्यांच्यावर संस्कार कसा झाला आणि समविचारी सहकाऱ्यांमुळे या वाटचालीत त्यांना साफल्य कसे लाभले हे भावपूर्ण रितीने सांगितले आहे. शिक्षणक्षेत्रातील आपल्या कामाचे आणि लेखन संसाराचे वर्णन करतानाच प्रधानांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाचेही हृद्य चित्र रेखाटले आहे.
Shyamchi Aai | श्यामची आई
अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.
-आचार्य अत्रे
Reviews
There are no reviews yet.