1922 ते 71 असे जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बॅ.नाथ पै यांचे जीवन म्हणजे अकाली विझलेला एक झंझावात होता. कोकणात जन्माला आलेला हा माणूस तारुण्याच्या उंरबठ्यावर असताना 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात उडी घेतो, स्वातंत्र्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जातो, 1952 ची निवडणूक बेळगावमधून लढवण्यासाठी भारतात परत येतो, त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत इंग्लंडला जातो. बॅरिस्टर होऊन ऑस्ट्रियन मुलीशी विवाह करून भारतात येतो आणि 1957, 62 व 67 या तिन्ही निवडणुका कोकणातील राजापूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या वतीने जिंकतो, लोकसभेत उत्तम संसदपटू म्हणून काम करताना देशाचे लक्ष वेधतो आणि वयाची पन्नाशी गाठायच्या आत हे जग सोडून जातो. अशा या झंझावाताचे त्याच्या जवळच्या मित्राने व सहकाऱ्याने रेखाटलेले हे चरित्र आहे.
नोकरशाईचे रंग | Nokarshaiche Rang
₹240.00देशात आणि जगभरातील अनेक देशांच्या राजधान्यांत, भारत सरकारच्या सल्लागारपासून प्रभारी राजदूतापर्यंत अनेक भूमिका प्रभावीपणे पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चिंतन, मनन व लेखन करणारे ‘विश्वनागरिक’ ज्ञानेश्वर मुळे, आपल्या सरकारी कोशातून बाहेर पडून वाचकांशी हळूवार संवाद साधत आहेत.
Reviews
There are no reviews yet.