1922 ते 71 असे जेमतेम 48 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नाथ पै यांनी 1957, 62 व 67 या तीन लोकसभा निवडणुका समाजवादी पक्षातर्फे जिंकून संसदेत असा ठसा उमटवला की, लोकसभेत त्यांचे भाषण असेल तेव्हा पंतप्रधान नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी आणि विरोधी पक्षांमधील अनेक दिग्गज नेते आवर्जून उपस्थित राहात. बॅ.नाथ पै यांची संसदेबाहेरील लहान असो वा मोठ्या जनसमुदायापुढील भाषणेही तेवढीच रोचक होत असत. राजकारणाबरोबरच, कला, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर त्यांची वाणी बरसू लागली, तर त्यांचे चाहते तर भक्तिरसात डुंबत असतच, पण त्यांचे विरोधक कधी माना डोलवायला लागत हे त्यांचे त्यांनाही कळत नसे. अशा या बॅ. नाथ पै यांच्या संसदेबाहेरील 15 भाषणांचा हा संग्रह आहे.
Sale
₹350.00 ₹280.00
₹800.00 ₹640.00
₹300.00 ₹240.00
₹250.00 ₹200.00
₹175.00 ₹140.00
₹250.00 ₹200.00
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
Meet The Author
No products were found matching your selection.
Weight | 0.25 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1.5 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 192 |
Be the first to review “लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana” Cancel reply
Related products
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार | Gandhiji Ani Tyanche Tikakar
गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले – ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ | Mahatma Gandhi : Jivan Ani Karyakal
जगाच्या इतिहासात ज्या मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या पाठीशी सरकारची शक्ती उभी होती. चर्चिल, रुझवेल्ट, लॉईड जॉर्ज, स्टॅलिन, लेनिन, हिटलर, वुडरो विल्सन, कैसर, लिंकन, नेपोलियन, मेटरविच आणि टेलीरँड ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याशी तुलना करता, अधिकारावर नसलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव मनात येते, ते म्हणजे कार्ल मार्क्स. परंतु त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेची व्यवस्था कशी असावी याची निश्चित तत्त्वप्रणाली मांडली. गांधींप्रमाणे माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीला अंत:करणपूर्वक ज्यांनी आवाहन केले, त्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपल्याला कित्येक शतके मागे जावे लागेल. धार्मिक इतिहासाचा तो एक कालखंड होता. येशू ख्रिस्त, रोमन चर्चमधील काही प्रीस्ट्स्, बुद्ध, हिब्रूंचे ईश्वराचे प्रेषित आणि ग्रीक संत इत्यादी धर्मवेत्त्यांनी माणसाच्या सदसद़्विवेकबुद्धीला हिरीरीने आवाहन केले होते. पण ते सगळे धर्मप्रचारक होते.
गांधी या सर्वांपासून निराळे होते. त्यांनी ईश्वर किंवा धर्माचा प्रचार केला नाही. ते जणू जागते-वागते प्रवचनकार होते. त्यांनी असे दाखवून दिले की, आधुनिक काळात आणि या काळातील राजकारणातही त्या सर्वांची तत्त्वे लागू करता येतील. सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून माणसाला गिळंकृत करणाऱ्या आधुनिक जगात गांधींसारखा एखादाच चांगला माणूस निर्माण होणे, हे अशक्य होते. सर्वच दृष्टींनी ते अत्यंत व्यवहारी होते. आयुष्य हे विविध प्रकारच्या जिवंतपणाने भरलेले असते याची त्यांना जाण होती.
अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी लिहिलेले ‘Mahatma Gandhi – His Life and Times’ हे पुस्तक 1951 ला प्रसिद्ध झाले. प्रकाशनानंतर सत्तर वर्षांनी हे पुस्तक प्रथमच मराठीत आले आहे. ‘गांधी’ हा ऑस्करविजेता सिनेमा याच पुस्तकावर आधारलेला होता.
Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद
21 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
धर्मांधता राज्यसंस्थेवरील घोर संकट । Dharmandhata : Rajyasansthevaril Ghor Sankat
उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ख्याती असलेल्या मधु लिमये यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘रिलीजियस बिगॉरिटी’ आणि ‘लिमिट्स ऑफ ऑथॉरिटी’ या पुस्तकांतील निवडक लेख.
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Reviews
There are no reviews yet.