गांधीविचाराची क्रांतिकारी परिवर्तनाशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी बनवण्यात गांधीवाद्यांनी, तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधींना जातिव्यवस्था-समर्थक/ मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच ‘शत्रू क्रमांक एक’ मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधींच्या विचारातील अनेक महत्त्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलूंचा आजच्या दृष्टीकोनातून केलेला साधक-बाधक विचार या पुस्तकात आहे, गांधींकडे पाहण्याचा निराळा दृष्टीकोन यातून मिळतो
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹280.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
Reviews
There are no reviews yet.