Saleनवी पुस्तके
₹120.00
Rugnanchya Chashmyatun | रुग्णांच्या चष्म्यातून
एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
– अतुल देऊळगावकर (प्रस्तावनेतून)
या कथा आहेत रोगांच्या रोग्यांच्या आणि डॉक्टरांच्या त्यांनी अनुभवलेल्या भावनांच्या, विचारांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या. या कथा सांगितल्या आहेत रुग्णांच्या चष्म्यातून, आणि डॉक्टरांच्याही ! त्या नवा दृष्टीकोन देतील.
– डॉ अभय बंग
Weight | 0.12 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 119 |
Gopal Rathi –
खूपच सुंदर लिखाण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लिखाण इमॅजिनेशन नसुन प्रत्यक्ष व्यक्तीच्या अनुभवातून लिहिल्या गेलेले आहेत. त्यामुळे त्यातली खोली व भाव मनाला खूप स्पर्श करून जातात.
वाचनीय पुस्तक.
सगळ्यांनी एक एक प्रत तरी घ्यावी
Ameya Ladda (verified owner) –
डॉक्टर आणि हॉस्पिटल हे स्वतःतच एक वेगळं विश्व असतं. आणि नाही म्हटलं तरी प्रत्येकाचा याच्याशी आयुष्यात संबंध येतोच.
डॉक्टर, पेशंट व त्यांचे नातेवाईक या सगळ्यांची त्या वेळेची मानसिकता व त्यातून आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी असलेले हे पुस्तक वाचकाला समृद्ध करते आणि नवा दृष्टिकोन सुद्धा देते.
Worth Reading! 👍🏻
Naresh Ubale. –
डॉक्टर जेव्हा त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु करतात व जसजसे ते त्यात रमतात.या काळात रुग्णांकडून ते कसे शिकत जातात व हळूहळु चांगले डॉक्टर म्हणून कसे तयार होतात याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.हा एक खूप वेगळा दृष्टिकोन या पुस्तकात वाचायला मिळतो.थोडक्यात रुग्णही डॉक्टरला कसे घडवत असतात हा नवीन दृष्टिकोन या पुस्तकाच्या रूपाने डॉक्टर असलेल्या लेखिकेने मांडला आहे.
सुंदर पुस्तक आहे.
Naresh Ubale. –
छान पुस्तक आहे