मुळात सार्कमधील राष्ट्रे भारताचे शेजारी आहेत. या देशांतील मुले पदवीनंतर सार्क विद्यापीठात शिकण्यासाठी दिल्लीत येतात, दोन वर्षे राहतात, त्यानंतर पुन्हा आपापल्या वा अन्य देशांत जातात. म्हणजे या दोन वर्षांच्या काळात, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रदेश व संस्कृतीतून आलेली मुले-मुली एकत्र येतात तेव्हा काय घडते ? ते कसे सामोरे जातात, नव्या व अचानक बदललेल्या परिस्थितीला? त्यांच्यातील संघर्ष व समन्वय कसे घडून येतात ? त्यांच्यात परिवर्तन काय व कसे होते? असे काही कवडसे पकडता यावेत, इतकाच माफक हेतू समोर ठेवून ‘सार्क विद्यापीठातील दिवस’ हा विशेषांक साधना साप्ताहिकाने काढला होता. त्यासाठी आठ देशांतील आठ मुला-मुलींनी केलेली ही अभिव्यक्ती वाचून देश आणि धर्म यांच्यापेक्षा भाषा आणि संस्कृती यांचे मोल अधिक आहे, असा निष्कर्ष काढता येईल. आणि इथून-तिथून मानवजात एकच आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.
हिरवे पान | Hirave Paan
₹70.00हिरवे पान (पत्रसंग्रह) – फर्ग्युसन कॉलेजमध्ये वयाच्या विशीत असताना संकल्प गुर्जर या तरुणाने त्याच्या मैत्रिणीला लिहिलेली पत्रे.
Reviews
There are no reviews yet.