Saleनवी पुस्तके

130.00

Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022

(1 customer review)

साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक

     

Out of stock

Share

अनुक्रम

‘सुलभा महाजन’ सोबत प्रवास करा! – जब्बार पटेल (संवादक : दिपाली अवकाळे)

मनस्वी जगणं आणि लिहिणं – शांता गोखले (संवादक : संध्या टाकसाळे, शिल्पा शिवलकर)

भाषा आणि रेषा यांचा योग्य मेळ म्हणजेच उत्तम साहित्य – ल. म. कडू (संवादक : सुशील धसकटे)

(भारतीय सिनेमाची) दुसरी फाळणी – विजय पाडळकर 

जेम कॅम्पिअन तिच्या बायका, तिचे पुरुष – मीना कर्णिक

मी आणि माझे गुरु अनिरुद्ध गुप्ता – राजन हर्षे 

निसर्गसत्र – अतुल देऊळगावकर

पंतप्रधान : दिसलेले, पाहिलेले, भेटलेले – विनय हर्डीकर

Size

M, S

Pages

204

1 review for Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022

  1. Chasity

    Hi there! I’m at work surfing around your blog from my new
    apple iphone! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Carry on the superb work!

    Look into my web page: eTextbookShelf

Add a review

Your email address will not be published.