वस्तुतः हे पुस्तक ठरवून लिहिले गेलेले नाही. वेगवेगळ्या निमित्ताने जे बोलले गेले व त्या-त्या वेळी प्रसिद्ध होत गेले, त्यातून जुळून आलेले हे पुस्तक आहे. पण या सर्व लेखनाला जोडणारे समान व बळकट धागे अनेक आहेत. शिवाय, या लेखनाच्या मध्यवर्ती वाहतो आहे एक जोरदार प्रवाह. तो प्रवाह आहे 2013 नंतरच्या दहा वर्षांत या देशातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात केंद्रीय सत्तेने केलेला अनिष्ट व आक्षेपार्ह हस्तक्षेप. त्या हस्तक्षेपाचा दीर्घकालीन परिणाम प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षता यांच्यावर झालेला आहे. म्हणून गेल्या दशकातील भारतात केंद्रीय सत्तेने केलेले अतिक्रमण समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹280.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
Reviews
There are no reviews yet.