डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि नंतरच्या कालखंडातही अनेक युवक-युवती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या तरुणाईला डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा अधिक तपशीलवार परिचय व्हावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीला प्रेरणा मिळावी, हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे. 1985 पासून 20 ऑगस्ट 2013 पर्यंत म्हणजे जवळजवळ 28 वर्षे मी डॉ. दाभोलकरांचा चळवळीतील साथी होतो, त्यामुळे त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार आणि समाजाप्रती असलेली तळमळ हे सर्व मी जवळून अनुभवत होतो. माझे व इतर सहकाऱ्यांचे अनुभव एकत्र करून हे पुस्तक साकार झाले आहे.
– प्रा. प. रा. आर्डे
Reviews
There are no reviews yet.