आता मी उर्दू भाषेचा ‘डिप्लोमा होल्डर’ आहे. त्याच सुमाराला गुरुजींनी मला हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचायचं राहून गेलं होतं. ‘कोरोना’ काळात हे नाटक हाती लागलं. पुन्हा आता आत्मविश्वासही होता, म्हणून हे नाटक वाचलं. सन १९६४ मध्ये लिहिलेलं नाटक सन २०२० मध्येसुद्धा अगदी प्रस्तुत आहे, लागू पडतं आहे, हे पाहून मी चकित होत राहिलो. भोवती आज जे घडतं आहे, त्याबद्दलची चर्चा साठ वर्षांपूर्वीच्या नाटकात केली तर आहेच; पण दिशादर्शनही केलंय, तोडगाही सांगितलाय, हे पाहून मी आणखीनच चकित झालो. या नाटकाचा मराठी अनुवाद केला पाहिजे, असं मला वाटू लागलं. मग अल्पावधीत थेट उर्दूतून मराठीत हा अनुवाद उतरून आला.
Dantkatha । दंतकथा
₹50.00हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांची 1990 मध्ये प्रकाशित झालेली ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जीवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतिकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.
Reviews
There are no reviews yet.