अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही जरी अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झाली, तरी अंधश्रद्धा निर्मूलन ते शास्त्रीय विचारपद्धती, शास्त्रीय विचारपद्धती ते वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक दृष्टीकोन ते धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सा ते धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता ते विवेकवाद आणि मानवतावाद या मार्गाने ही चळवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे स्वाभाविकपणेच ‘विवेकवाद’ हे मूल्य अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. ‘विवेकवाद’ हे कशाचं तत्त्वज्ञान आहे? ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
Vidnyanane Mala Kay Dile | विज्ञानाने मला काय दिले
₹80.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.
Reviews
There are no reviews yet.