डिकन्स आणि ट्रोलॉप । Dickens and Trolop
₹70.00डिकन्स आणि ट्रोलॉप (व्यक्तिचित्रे) – चार्ल्स डिकन्स व ॲन्थनी ट्रोलॉप या दोन ब्रिटिश कादंबरीकारांवर त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांत लिहिलेले दोन दीर्घ लेख.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant
₹70.00हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.
मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.
बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.
तरुणाईसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर | Tarunaisathi Dr. Narendra Dabholkar
₹240.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि नंतरच्या कालखंडातही अनेक युवक-युवती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या तरुणाईला डॉक्टरांच्या कर्तृत्वाचा अधिक तपशीलवार परिचय व्हावा आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या चळवळीला प्रेरणा मिळावी, हा या पुस्तक लेखनामागचा मुख्य हेतू आहे.
तीन तलाक विरुद्ध पाच महिला | Tin Talaq Viruddha Pach Mahila
₹80.00तीन तलाक विरुद्ध पाच महिला (रिपोर्ताज) – शायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक अवैध ठरवला. त्या पाच महिलांशी त्यांच्या गावात जाऊन केलेला संवाद.
तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas
₹200.00डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.
तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.
तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.