आई | Aai
₹200.00‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या झापडबंद समजातून स्त्रीला बंधमुक्त करण्याचा एक प्रयत्न ….
Bharatiya Sanskruti | भारतीय संस्कृती
₹200.00स्त्रीपुरुषतुलना | Streepurushtulana
₹200.00भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक महत्त्वाचे मानले जाते. का, तर ते सत्तांतराचे शतक आहे, नव्या जीवनजाणिवांच्या आरंभाचे शतक आहे, वैचारिक कलहाचे शतक आहे, आत्मपरीक्षणाचे शतक आहे, परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार न करता परंपरेला आव्हान देणारे शतक आहे, मूलभूत प्रश्नांची जाग आणणारे शतक आहे, परंपरेला आक्रमकपणे सामोरे जाऊन नवा विचार मांडणाऱ्यांचे शतक आहे, नव्या शक्तीच्या उपासनेचे शतक आहे, एवंच, प्रबोधनाचे शतक आहे. ‘तत्पूर्वीच्या एक हजार वर्षांत जे घडले नाही’ ते ज्या शतकात घडले असे शतक आहे, मराठी वाङ्गयाच्या दृष्टीने नवनवीन लेखने व लेखनप्रकार ज्या शतकात निर्माण झाले असे शतक आहे. या शतकाने मराठी वाङ्गयाला जी अनमोल रत्ने दिली, त्यांपैकी एक म्हणजे ताराबाई शिंदे (1850-1910) यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक. या पुस्तकात स्त्री-पुरुषांमधील सारा असमतोल दूर करून स्त्रीजातीला पुरता न्याय मिळवून द्यावा अशी खटपट आहे. इतके आधुनिक क्रांतदर्शी विचार इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने एका स्त्रीने मांडलेले, मराठी गद्याने पहिल्यांदाच अनुभवले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892) आणि महात्मा जोतीराव फुले (1827-1890) यांच्या लेखणीने ही करामत यापूर्वी केली असली, तरी एका स्त्रीने हे धैर्य दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.
राजकारण जिज्ञासा | Rajkaran Jidnyasa
₹200.00राजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.
निवेदन | Nivedan
₹200.001876 ते 1947 असे 70 वर्षांचे आयुष्य धर्मानंद कोसंबी यांना लाभले. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर मृत्यू सेवाग्राम आश्रमात. वयाच्या ऐन पंचविशीत ते बुद्धी प्रेमाच्या आणि बुद्ध धर्माच्या शोधात घराबाहेर पडले.
पुढील दीड दशकांत त्यांनी पुणे, ग्वाल्हेर, काशी, नेपाळ, गया, मद्रास, श्रीलंका, म्यानमार, कलकत्ता, इंदौर, सिक्कीम, बडोदा, अमेरिका असा प्रवास केला.
ते प्रवास आणि तोपर्यंतचे त्यांचे आत्मकथन म्हणजेच हे निवेदन. कमालीचे वाचनीय आणि थक्क करणारे, अचंबित करणारे.
हे पुस्तक 1924 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले.
शंभर वर्षे झाली त्याला. त्या निमित्ताने, आणि त्यांचे 150 वे जयंती वर्ष 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले, त्या निमित्तानेही आणलेली ही नवी आवृत्ती…!



