Shop

Saleनवी पुस्तके

Balkumar Diwali Ank | बालकुमार दिवाळी अंक

60.00

सहा विषयांचे अंतरंग उलगडून दाखवणारे सहा लेख या अंकात आहेत. त्या त्या विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे आणि त्या त्या विषयांचे समाजजीवनाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे हे लेख, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून लिहून घेतले आहेत. या सर्वांनी आपापल्या विषयात अध्यापन व संशोधन तर केलेले आहेच, शिवाय आपापला विषय समाजजीवनातील विविध क्षेत्रांत रुजविण्यासाठी या ना त्या प्रकारे योगदान दिलेले आहे.

Saleनवी पुस्तके

Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत

70.00

कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.

 

Saleनवी पुस्तके

Bharatiya Sanskruti | भारतीय संस्कृती

200.00
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
– साने गुरुजी

         

Charvak। चार्वाक

160.00

आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.

     

Saleनवी पुस्तके

Dev Tethechi Janava | देव तेथेचि जाणावा

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

पाच वर्षांत समाजकार्य विभागात दर वर्षी पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये समाजकार्य जीवनगौरव, कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, कार्यकर्ता पुरस्कार संघर्षासाठी, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार आणि विशेष कार्य पुरस्कार किंवा युवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील समाजकार्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 25 व्यक्तींच्या मुलाखतीचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

Dharmaresha Olandatana | धर्मरेषा ओलांडताना

240.00
या पुस्तकात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या 15 मुलाखती आहेत. या मुलाखतींमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे प्रेमविवाह जरी असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबीयांशी, सभोवतालाशी त्यांनी कशा पद्धतीनं जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजुती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली, या तऱ्हेच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात, इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे.

 

   

 

Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण

40.00

अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.

Ekaki | एकाकी

100.00

एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.

     

1 2 3 28