Vidnyanane Mala Kay Dile | विज्ञानाने मला काय दिले
₹100.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.
 
            
 
             
            



 
             
             
             
             
             
            