भारतातील मुस्लिम राजकारण | Bhartatil Muslim Rajkaran
₹160.00भारतातील मुस्लीम राजकारण (लेखसंग्रह) – दिलीप पु. चित्रे यांनी शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद करून ‘Muslim Politics in India’ हे पुस्तक तयार केले, त्याचा हा मराठी अनुवाद मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे.
भारतीय अर्थकारणावरील निबंध | Bhartiya Arthkarnavaril Nibandh
₹360.00“स्थानिक सत्तेचे सर्वांत कनिष्ठ एकक विचारात घ्यायचे झाले तर भारतातील ग्रामसमुदायाइतक्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी एककासारखा कोणताच दाखला युरोपातील कोणत्याही देशात सापडत नाही. रशियातील ‘मीअ’ (Mere), जर्मनीमधील ‘गाउ’ (Gau), फ्रान्समधील ‘कमिन’ (Commune), इंग्लंडमधील ‘पॅरिश’ (Parish) यांचा उगम भारतीय गावाशी मिळताजुळता असला तरी, जुन्या काळी भारतीय ग्रामसमुदाय पूर्ण स्वातंत्र्य बाळगून होता, तसे मात्र या इतर देशांमधील रचनांबाबत म्हणता येत नाही. पण, भारतातील लोकांनी सभ्य व सामुदायिक जीवनाचा पुढील विकास मात्र साधला नाही.
जुन्या ग्रीक व रोमन समुदायांनी अनुक्रमे ‘सिव्हिटास’ व ‘डेमॉस’ या रचना परिपूर्णरीत्या विकसित केल्या. इटलीतील काही शहरे, जर्मनीतील काही स्वतंत्र शहरे, नेदरलँड्स व स्वित्झर्लंड आणि युरोपीय इतिहासातील सर्वोत्तम काळाचा अपवाद वगळता ग्रीक व रोमन समुदायांच्या रचनांच्या तोडीची कामगिरी इतरांना फारशी करता आली नाही.”
– न्या. महादेव गोविंद रानडे (इंग्लंड व भारत येथील स्थानिक शासन)
भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank
₹50.00क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.
मधुघट | Madhughat
₹160.00मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण 13 लेखांचा संग्रह.
मला प्रभावित करून गेलेला सिनेमा । Mala Prabhavit Karun Gelela Cinema
₹240.00मला प्रभावित करून गेलेला सिनेमा (लेखसंग्रह) – सिनेमातील लोक, सिनेमाचे समीक्षक आणि साहित्यिक अशा तीन घटकांतील 27 व्यक्तींनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या प्रत्येकी एका सिनेमाविषयी लिहिलेले लेख.




