सा. रे. पाटील बोलतोय | Sa. Re. Patil Boltoy
₹120.00सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.
(शब्दांकन – किशोर रक्ताटे)
अशी घडले मी | Ashi Ghadale Mi
₹120.00अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.
असेही विद्वान | Asehi Vidwan
₹120.00असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
वारसा प्रेमाचा | Varasa Premacha
₹120.00वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट | Angry Young Secularist
₹120.00अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहिलेली 13 पत्रे आणि दलवाईंवर इतर 13 मान्यवरांनी लिहिलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.