लोकशाहीचा कैवारी | Lokshahicha Kaivari
₹200.00लोकशाहीचा कैवारी (चरित्र) – उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ओळख असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे राजकीय, सामाजिक जीवन त्यांच्या मित्राने रेखाटले आहे.
लोकशाहीची आराधना | Lokshahichi Aaradhana
₹200.00लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
वाचता वाचता । Vachata Vachata
₹280.00गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.
वादळाचे किनारे | Vadalache Kinare
₹80.00नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येक वेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची, बुद्धीची, क्षमतांची.
वारसा प्रेमाचा | Varasa Premacha
₹120.00वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
विकास गीते | Vikas Geete
₹80.00आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.