लढे अंधश्रद्धेचे | Ladhe Andhashraddheche
₹280.00लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
बखर : भारतीय प्रशासनाची | Bakhar : Bharatiya Prashasanachi
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टीकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना
₹280.00साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.
श्यामची आई (सचित्र) | Shyamchi Aai (Sachitra)
₹280.00साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट 2023 च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
पुस्तकात 42 प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील 35 छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्त्वाचा ऐवज आहे.
गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi
₹280.00मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.

आजचे मास्टर्स | Aajache Masters
₹280.00गेल्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळे प्रयोग होताहेत. अनेक देशांत, अगदी अपारंपरिक देशांतसुद्धा. या आगळ्यावेगळ्या धडपडीची दखल घेतली जाते जगातल्या महत्त्वाच्या जागतिक चित्रपट महोत्सवांत. तिथे जोखली जातात नव्या संवेदनांची स्पंदनं, नव्या जाणिवा. कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी बराच काळ मेंदूला सुखद धक्का देणाऱ्या. कधी कधी काही चित्रपट त्यांच्या देशातल्या सामाजिक-राजकीय घडामोडी, मानवी समस्या, स्त्री-पुरुष संबंध, तरुणाईतले नाजूक अनुबंध, युद्धाचे घनघोर आघात आणि त्याचबरोबर राज्यसत्तेने आणलेली कलात्मक आविष्कारावरची तथाकथित नैतिक बंधनं या सगळ्या कलाबाह्य गोष्टींवर मात करीत मैलाचा दगड ठरतात. त्या कलाकृतींना कोणी नाही थांबवू शकत. इतकंच नव्हे, तर मागच्या काही क्लासिक्ससुद्धा माना डोलवून दखल घेतात. इथे भेटणाऱ्या दिग्दर्शकांनी उत्तम कलाकृती दिलेल्या आहेत यात शंकाच नाही. त्यांनी परंपरांचं ओझं झेलत, पडताळत मागच्या क्लासिक्सना अभ्यासत वाटचाल केलीय की या सगळ्या गोष्टी झुगारून देऊन स्वतंत्र वाटचाल केलीय हे वाचकांनी पारदर्शीपणे पाहायला हवं.
– डॉ. जब्बार पटेल (प्रस्तावनेतून)
मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक (मनोगतामधून)
श्रीकांत भाग 1-2 | Shrikant Bhag 1-2
₹280.00श्रीकांत हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.



