Sa Re Patil Boltoy | सा. रे. पाटील बोलतोय
₹120.00सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.
(शब्दांकन – किशोर रक्ताटे)
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
₹240.00‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार
₹160.00साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
Rutu Barawa । ऋतू बरवा
₹200.00Angry Young Secularist | अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट
₹125.00अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहलेली १३ पत्रे आणि दलवाईंवर इतर १३ मान्यवरांनी लिहलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.
Muslim Manaacha Kanosa | मुस्लिम मनाचा कानोसा
₹240.00मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लिम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांकडे व मुस्लिमांच्या मनात घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे, एवढाच या टिपणांचा हेतू आहे. मुस्लिम समाजाचे मनोगत मराठी वाचकांसमोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. मुल्कपरस्तांनी या दृष्टीने जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते. असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे.
Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta | बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता
₹280.00रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू १९९५ साली झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. २५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.