सा. रे. पाटील बोलतोय | Sa. Re. Patil Boltoy
₹120.00सा. रे. पाटील बोलतोय (आत्मकथन) – दक्षिण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एका आदरणीय व कर्तृत्ववान व्यक्तीने, आदर्शाचा पाठपुरावा करीत केलेल्या रचनात्मक कार्याच्या आठवणी.
(शब्दांकन – किशोर रक्ताटे)
साने गुरुजींची जीवनगाथा | Sane Gurujinchi Jeevangatha
₹640.00पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हेच आहे.
साने गुरुजींची सहा पुस्तके | Sane Gurujinchi 6 Pustake
₹800.00सुंदर पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची आई (आत्मकथनात्मक)
श्याम (आत्मकथनात्मक)
धडपडणारा श्याम (आत्मकथनात्मक)
श्यामचा जीवनविकास (आत्मकथनात्मक)
सार्क विद्यापीठातील दिवस | SAARC Vidyapithatil Divas
₹70.00सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.
सुंदर पत्रे । Sundar Patre
₹200.00सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.
– ना. ग. गोरे
सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat
₹70.001901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले.
त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’.
तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.