तीन तलाक विरुद्ध पाच महिला | Tin Talaq Viruddha Pach Mahila
₹80.00तीन तलाक विरुद्ध पाच महिला (रिपोर्ताज) – शायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक अवैध ठरवला. त्या पाच महिलांशी त्यांच्या गावात जाऊन केलेला संवाद.
दंतकथा । Dantkatha
₹60.00हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या 1990 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जिवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतीकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.
धर्मांधता राज्यसंस्थेवरील घोर संकट । Dharmandhata : Rajyasansthevaril Ghor Sankat
₹200.00उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ख्याती असलेल्या मधु लिमये यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘रिलीजियस बिगॉरिटी’ आणि ‘लिमिट्स ऑफ ऑथॉरिटी’ या पुस्तकांतील निवडक लेख.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
₹280.00शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
₹160.00एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन | Drushtikon Aakarala Yeiparyantche Wachan
₹50.00नियोजित विशेषांक एक थीम घेऊन काढणार आहोत, ‘दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन’ अशी ती थीम आहे.
सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो.
तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींना आम्ही या अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती केली आहे.
1500 शब्द मर्यादेतील लेख म्हणजे अंकाची चार पाने प्रत्येकासाठी राखून ठेवली आहेत. दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून तो लेख लिहावा, अशी विनंती त्या सर्वांना केली आहे. अर्थातच, त्यानंतरच्या टप्प्यातील किंवा कालखंडातले वाचन, बदललेल्या धारणा हे या लेखांमध्ये अपेक्षित नाही.
कारण, या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, हा अंक वाचून आजच्या तरुण पिढीला स्वतःचे मूल्यमापन करता यावे, स्वतःचा दृष्टीकोन तपासून घेता यावा. म्हणजे या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.
गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi
₹240.00मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.