Shop

गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi

280.00

मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.

श्यामची आई (सचित्र) | Shyamchi Aai (Sachitra)

280.00

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट 2023 च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात 42 प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील 35 छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्त्वाचा ऐवज आहे.

Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना

280.00

साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.

     

बखर : भारतीय प्रशासनाची | Bakhar : Bharatiya Prashasanachi

280.00

भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टीकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख

लढे अंधश्रद्धेचे | Ladhe Andhashraddheche

280.00

लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.

 

            

झपाटलेपण ते जाणतेपण | Zapatlepan Te Janatepan

280.00
झपाटलेपण ते जाणतेपण (आत्मनिवेदने) – प्रतीक्षा लोणकर, राजन गवस, अतुल कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अभिजित वैद्य, संजय भास्कर जोशी, सुभाष वारे इत्यादी 12 नामवंतांचे स्वतःचा जीवनप्रवास सांगणारे लेख.

     

कॅप्टन लक्ष्मी आणि राणी झांशी रेजिमेंट | Captain Laxmi Aani Rani Jhansi Regiment

280.00
राणी झांशी रेजिमेंटची उभारणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कशी केली, त्याची रोमहर्षक कहाणी.

     

पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan

280.00

शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!

अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.

गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.

– विनय हर्डीकर

     

 

1 5 6 7 30