Ekaki | एकाकी
₹100.00एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
Tin Talaq Viruddha Pach Mahila | तीन तलाक विरुद्ध पाच महिला
₹80.00तीन तलाक विरुद्ध पाच महिला (रिपोर्ताज) – शायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक अवैध ठरवला. त्या पाच महिलांशी त्यांच्या गावात जाऊन केलेला संवाद.
Dantkatha । दंतकथा
₹50.00हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांची 1990 मध्ये प्रकाशित झालेली ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जीवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतिकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
₹280.00शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.