चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹100.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर
Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना
₹280.00साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.
थैमान चंगळवादाचे | Thaiman Changalvadache
₹50.00आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन् उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.
डॉ. नरेंद्र दाभोलकर
आई | Aai
₹200.00‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या झापडबंद समजातून स्त्रीला बंधमुक्त करण्याचा एक प्रयत्न ….
बखर : भारतीय प्रशासनाची | Bakhar : Bharatiya Prashasanachi
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टीकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
Balkavitancha Super Chaukar | बालकवितांचा सुपर चौकार : चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलमगोल, क कवितेचा
₹300.00मराठीतील नामवंत कवी दासू वैद्य यांनी मागील दोन दशकांत लिहिलेल्या कवितांची ही चार पुस्तके आहेत.
1. चष्मेवाली : पाने 24 (यात एकच गोष्टीरूप दीर्घ कविता आहे.)
2. गोलमगोल : पाने 32 (यात 15 लहान कविता आहेत.)
3. झुळझुळ झरा : पाने 36 (यात 16 लहान कविता आहेत.)
4. क कवितेचा (यात 31 लहान कविता आहेत.) डबल क्राऊन आकारात, आर्ट पेपरवर, भरपूर चित्रे असलेली, संपूर्ण बहुरंगी पुस्तके!
Saptahik Sadhana Diwali 2022 | साप्ताहिक साधना दिवाळी 2022
₹130.00साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक हा पूर्वीपासूनच वर्गणीदार वाचक नसलेल्या वाचकांमध्येही विशेष दखलपात्र ठरत आलेला आहे. पण मागील 15 वर्षे नियमितपणे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील नऊ वर्षे युवा दिवाळी अंकही प्रकाशित होत आला आहे. साहजिकच, मुख्य दिवाळी अंकाच्या पानांची संख्या आणि त्यातील मजकुराची विविधताही कमी होत गेलेली दिसेल. पण हे तीन दिवाळी अंक एकत्रित पाहिले आणि वर्षभरात प्रसिद्ध होणारे अन्य पाच-सात विशेषांक पाहिले तर लक्षात येईल- पूर्वीच्या तुलनेत अधिक आशय-विषय येत असून, विविधताही जास्त आहे… साधनातील लेख अधिक शब्दसंख्येचे व गंभीर वैचारिक असतात, हा काही वाचकांच्या मनात दुरावा निर्माण करणारा प्रकार आहे. मात्र तसा आशय व तसे विषय प्रसिद्ध करण्यासाठीचे विचारपीठ म्हणून साधनाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते आशय-विषय पेलवू शकतील अशा ताकदीचे वाचकही साधनाकडे अन्य माध्यमसंस्थांच्या तुलनेत जास्त आहेत. प्रस्तुत दिवाळी अंकाकडेही त्या दृष्टीने पाहिले जावे अशी अपेक्षा आहे! – संपादक, साधना साप्ताहिक