१९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना साने गुरुजींनी पाच दिवसांत ‘श्यामची आई’ हे दोनशे पानांचे पुस्तक लिहिले, १९५३ मध्ये त्यावर आधारित आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमाही आला. ते पुस्तक मराठी साहित्यविश्वात आणि तो सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन मानले जातात. मागील पाऊणशे वर्षांत महाराष्ट्रातील घराघरात ‘श्यामची आई’ पोहोचली. ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल ८८ वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे. या माहितीचा उपयोग करून विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यासाठी अनेकांना बळ मिळेल. आणि या माहितीत भर टाकून नवी संकलने प्रकाशित करण्याची प्रेरणाही काहींना मिळेल. विद्यार्थी, शिक्षक, पालक, अभ्यासक, कार्यकर्ते आणि संस्था व संघटना चालक यांना हे संकलन उपयुक्त वाटेल.
Ashi Ghadale Mi | अशी घडले मी
₹120.00अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.