वयाच्या ९९ व्या वर्षी दादांनी लिहिलेल्या आठवणी म्हणून या पुस्तकाकडे पाहिले तर त्याचे मोल लक्षात येते. आयुष्याच्या या समयी अनेक गाळण्यांतून उतरलेले सत्व आणि स्वत्व म्हणजे हे लेखन आहे. दादांची भाषेवरची व शब्दांवरची पकड आजही कायम आहे आणि तपशिलाबाबतही ते अद्याप काटेकोरच आहेत. नम्रता, प्रामाणिकपणा, लवचिकता, सामंजस्य, समाजभिमुखता, कुटुंबवत्सलता या सद्गुणांचा ग्राहक म्हणून दादा प्रामुख्याने या लेखातून डोकावत राहतात. पण गांधीजींनी जी सात सामाजिक पातके सांगितली त्यातील एक आहे- तत्त्वविहीन राजकारण, त्या पातकाची चाड बाळगणारा राजकारणी म्हणूनही दादा या पुस्तकातून ठळकपणे प्रतिबिंबीत होत राहतात.
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
₹140.00माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.