सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादी साहित्य व पुराणांमध्ये सापडतं. ही मुळं शोधून हे सण समारंभ का निर्माण झाले, त्या वेळी त्यांचा काय उपयोग होता किंवा गरज होती; आज त्यांचा किती उपयोग आहे व गरज आहे का; आपल्या प्रगतीच्या ते आड येत आहेत का; त्यांच्यापायी आपण आपला किती वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करावी याचा ऊहापोह प्रत्येक व्यक्तीने आपापल्या बुद्धिविचारानुसार स्वतंत्रपणे करायला हवा. तसाच तो सार्वजनिक पातळीवरही व्हायला हवा. कारण सार्वजनिक उत्सवांनाही ऊत आला आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर तरी सुरू करू या. ती कशी ते या पुस्तकात सुचविले आहे.
Bharatiya Sanskruti | भारतीय संस्कृती
₹200.00एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
– साने गुरुजी
Reviews
There are no reviews yet.