Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक
₹560.00टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षी, म्हणजे 1956 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले टिळकांचे इंग्रजी चरित्र.
1 मे 1947 रोजी गुरुजींनी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे यासाठी उपोषण सुरु केले… आणि मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले. तो एकूण घटनाक्रम भारतीय समाजजीवनाच्या कुरूपतेचे दर्शन घडवणारा होता, मात्र शतकानुशतकांचे जडत्व लाभलेल्या रूढी परंपरा (उदात्त ध्येयवादाच्या बळावर) मोडीत काढता येतात, याची प्रचिती देणाराही होता. त्याची एक झलक अनुभवण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.
कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा (लेखसंग्रह) – महाराष्ट्रीय मुसलमान, मुंबईकर मुसलमान, भारतीय मुसलमान, हिंदू-मुस्लीम संबंध, कानोसा : भारतीय मुस्लीम मनाचा या पाच लेखांचा संग्रह.
इस्लामचे भारतीय चित्र (रिपोर्ताज) – 1966 मध्ये तेव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेश सीमारेषेजवळील भारतीय प्रदेशातील लहान-थोरांशी साधलेली संवादचित्रे.
‘धर्माच्या चिकाच्या पडद्याआड वावरत असल्याने आपल्या हालचालींचा पत्ता मुस्लिमेतरांना लागणार नाही’, असे एकीकडे बऱ्याच मुसलमानांना वाटते. तर ‘चिकाच्या पडद्याआड काही का घडेना, आपल्याला त्याची दखल घेण्याचे कारण नाही’, अशी दुसरीकडे मुस्लिमेतरांची धारणा आहे. अशा दोन्ही प्रकारची मानसिकता राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हानिकारक आहे. अशी हानी होऊ नये’ असे आता लोकांना थोडेफार वाटू लागले आहे, हे एक शुभ लक्षण आहे. ‘कलमनवीस’ यांच्या लिखाणाचे या दृष्टीने महत्त्व आहे.
जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टीकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.
तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.