संकीर्ण

विज्ञान आणि समाज | Vidnyan Ani Samaj

100.00

विज्ञान आणि समाज (लेखसंग्रह) – डॉ. नरेंद्र दाभोलकर, सुबोध जावडेकर, मयंक वाहिया, विवेक सावंत व जॉर्ज ऑरवेल या पाच मान्यवरांचे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन, भ्रामक विज्ञान, प्राचीन भारतातील विज्ञान, मानवी बुद्धिमत्ता या विषयांचा वेध घेणारे लेख.

     

असेही विद्वान | Asehi Vidwan

120.00

असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.

     

Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण

65.00

अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.

दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन | Drushtikon Aakarala Yeiparyantche Wachan

50.00

नियोजित विशेषांक एक थीम घेऊन काढणार आहोत, ‘दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन’ अशी ती थीम आहे.

सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो.
तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींना आम्ही या अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती केली आहे.

1500 शब्द मर्यादेतील लेख म्हणजे अंकाची चार पाने प्रत्येकासाठी राखून ठेवली आहेत. दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून तो लेख लिहावा, अशी विनंती त्या सर्वांना केली आहे. अर्थातच, त्यानंतरच्या टप्प्यातील किंवा कालखंडातले वाचन, बदललेल्या धारणा हे या लेखांमध्ये अपेक्षित नाही.
कारण, या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, हा अंक वाचून आजच्या तरुण पिढीला स्वतःचे मूल्यमापन करता यावे, स्वतःचा दृष्टीकोन तपासून घेता यावा. म्हणजे या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.

थेट सभागृहातून | Thet Sabhagruhatun

240.00
थेट सभागृहातून (भाषणसंग्रह) – मनमोहन सिंग, चिदंबरम, ओबामा, आंग सान सू की ते गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर अशा 20 नामवंतांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी केलेली व गाजलेली भाषणे.

     

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना | Pudhe Janyashathi Mage Valun Pahtana

70.00

2017 च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत.

     

तात्पर्य | Tatparya

50.00
तात्पर्य (कुमारकथा) – युवा साहित्य अकादमी विजेत्या लेखकाने त्याच्या वयाच्या विशीत लिहिलेल्या व साधनात आठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नऊ बालकुमार कथा.

           

तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas

200.00

डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.

तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.

तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.

            

 

1 2 3 7