बालपणापासूनच्या सर्व अविस्मरणीय आठवणी एकत्रित केल्या. कल्पनेच्या साह्याने त्या विकसित केल्या. जीवनातील वास्तव अनुभव आठवणींच्या साह्याने मांडण्याचा प्रयत्न केला. आलेल्या अनुभवांच्या आधारे जीवनाचा अर्थ लावण्याची ही कसरत होती. अनुभवांशी प्रामाणिक राहून भावनांना वाट मोकळी करून दिली. आठवणी जुन्या आणि शब्द नवे. वर्षानुवर्षे कुठेतरी साठवून ठेवलेले आणि साठून राहिलेले हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. भूतकाळात डोकावून पाहताना प्रसंग, चित्रे जशीच्या तशी उभी राहात गेली. आणि नकळत कागदावर उतरत गेली. हे चित्रण म्हणजे केवळ घटनांचे किंवा व्यक्तिरेखांचे वर्णन नसून, त्याच्यामागे असलेल्या मनातील भावनांचा प्रवाह आहे.
Reviews
There are no reviews yet.